शेतकय्राने केलेल्या ‘त्या’ मागणीमुळे शरद पवार रोहित पवारांना म्हणाले ‘तुझी मागणी झाली बघ’ !

शेतकय्राने केलेल्या ‘त्या’ मागणीमुळे शरद पवार रोहित पवारांना म्हणाले ‘तुझी मागणी झाली बघ’ !

अहमदनगर – लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी पार पडल्यानंतर शरद पवार यांनी राज्याच्या दुष्काळी दौऱ्याला सुरुवात केली आहे. आज ते कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात होते. यावेळी त्यांच्यासोबत नातू आणि पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवारही होते. यावेळी एका शेतकय्राने “रोहित दादांना उमेदवारी द्या, ते 100 टक्के निवडून येतील,” अशी मागणी केली.  यावर शरद पवार हसत ‘तुझी मागणी झाली बघ’ असं रोहित पवार यांना म्हणाले.

दरम्यान गावकय्राने केलेल्या मागणीमुळे रोहीत पवार हे विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरतील असं बोललं जात आहे. सध्या कर्जत जामखेड मतदारसंघात भाजपचे कॅबिनेट मंत्री राम शिंदे विद्यमान आमदार आहेत. गावकऱ्यांच्या मागणीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसने रोहित पवार यांना उमेदवारी दिली, तर राम शिंदे विरुद्ध रोहित पवार अशी चुरशीची लढत हणार असल्याचं दिसत आहे.

COMMENTS