उदयनराजेंच्या फसवाफसवीच्या वक्तव्यावर काय म्हणाले शरद पवार ? पाहा व्हिडीओ

उदयनराजेंच्या फसवाफसवीच्या वक्तव्यावर काय म्हणाले शरद पवार ? पाहा व्हिडीओ

सातारा – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यामध्ये आज बैठक झाली. या बैठकीनंतर शरद पवारांचे कौतुक करत पवारांनी मला कडकडीत मिठी मारली असल्याचं उदयनराजे यांनी म्हटलं. तसेच  पण मी त्यांना म्हणालो फसवाफसवी मात्र करु नका, नाहीतर बघू अशा प्रकाराच इशाराच त्यांनी पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसला दिला. उदयनाराजेंच्या या वक्तव्यानंतर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते माझ्यासमोर असं काही बोलले नाहीत. तुमच्यासमोर बोलले असतील ते काही माहित नाही अशी प्रतिक्रिया पवार यांनी दिली आहे. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत उदयनराजे यांना तिकीट द्यायचं की नाही याबाबतही काही चर्चा झाली नसल्याचं पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्तच्या कार्यक्रमासाठी शरद पवार आज साता-यात आले होते. यावेळी जिह्यात विश्रामगृहात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पवारांची भेट घेतली. खासदार उदयनराजे भोसले यांनीही यावेळी पवार यांची भेट घेतली. तसंच शरद पवार आणि उदयनराजे यांच्यात बराच वेळ बंद खोलीत चर्चा झाली.

 

 

COMMENTS