विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या राजकीय पुनर्वसनाबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य !

विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या राजकीय पुनर्वसनाबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य !

अकलूज (सोलापूर) –  माढा लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या राजकीय पूनर्वसनाबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. शरद पवार हे विजयसिंह मोहीते-पाटील यांच्या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे विजयसिंह मोहीते-पाटील यांनी आगामी राजकीय भूमिका काय असणार याबाबत अनेकांना प्रश्न पडला होता. परंतु विजयसिंह मोहीते पाटील यांना माझ्या जागेवर राज्यसभेत पाठवणार असल्याचं पवारांनी म्हटलं आहे.

दरम्यान अकलूज येथे आज शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीनं मेळाव्याचं आयोजन केलं होतं. त्यानंतर शरद पवार हे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांन  विजयसिंह मोहीते पाटील यांना राज्यभेत पाठवणार असल्याचं म्हटलं आहे.

COMMENTS