शिर्डी साई संस्थानविरोधात ग्रामस्थांचा मोर्चा !

शिर्डी साई संस्थानविरोधात ग्रामस्थांचा मोर्चा !

अहमदनगर – शिर्डी साईबाबा संस्थान देशातील श्रीमंत संस्थानांपैकी एक आहे. देशासह विदेशातूनही साईंचे भक्त याठिकाणी येत असतात. तसेच अनेक भक्त साईबाबांना भरभरून दान करतात. कोट्यवधी रुपये या संस्थानाकडे जमा झाले आहेत. त्यामुळे मिळालेलं हे दान लोकांच्या उपयोगी येण्यासाठी साईबाबा संस्थानानं विदर्भातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांना यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी तिजोरीतून ७१ कोटी देण्याच्या निर्णय घेतला आहे. याच निर्णयाला शिर्डीतील ग्रामस्थांनी विरोध केला असून संस्थानाविरोधात गावकरी संतापले आहेत.

दरम्यान शिर्डीतील ग्रामस्थांनी आज साई संस्थानच्या विश्वस्थ व्यवस्थेविरोधात निषेध मोर्चा काढला आहे.हनुमान मंदिरासमोरून ग्रामस्थांच्या मोर्चाला सुरुवात झाली असून विदर्भातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांना यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी साई संस्थानच्या तिजोरीतून ७१ कोटी देण्याचा निर्णय मागे घेण्याची मागणी या ग्रामस्थांनी केली आहे. हनुमान मंदिर ते संस्थांच्या साईबाबा सुपर हॉस्पिटलपर्यंत शिर्डी ग्रामस्थांनी निषेध मोर्चा काढला आहे. त्यामुळे साई संस्थान हा निर्णय मागे घेणार का याकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS