“शिवाजी महाराज शूर होते, पण बुद्धिमान नव्हते”

“शिवाजी महाराज शूर होते, पण बुद्धिमान नव्हते”

शिवाजी महाराजांचं शौर्य, त्यांचा गनिमी कावा, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ याची हजारो उदाहरणे आपण इतिसाहासाच्या पुस्ताकातून वाचली आहेत. शिवाजी महाराज हे पराक्रमी आणि बुद्धीमान राजे होते. प्रत्येत मराठी माणसाला आणि देशातली अनेकांना शिवाजी महाराज हे प्ररणादाई होते आणि आजही आहेत. सीबीएसलीला मात्र बहुदा तसं वाटत नाही. कारण उत्तर प्रदेशातील एका पुस्तकात महाराजांबद्दल आक्षेपार्य मजकूर छापण्यात आला आहे. शिवाजी महाराज हे शूर होते मात्र ते बुद्धिमान नव्हते असं उत्तर प्रदेशातील एका पुस्तकात झापण्यात आलंय. इयत्ता पाचवीच्या व्याकरण वाटिका 5 या हिंदी पुस्तकात हा मजकूर छापण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील मधुबन या प्रकाशन संस्थेतर्फे हे पुस्तक छापण्यात आलंय. महाराष्ट्र टाईम्सनं हे वृत्त दिलंय.

अर्थातच हा मजकूर छापल्यामुळे मोठं वादंग निर्माण झालंय. सभांजी ब्रिगेडसह अनेक मराठा संघटनांनी या प्रकरणी प्रकाशन संस्था आणि लेखिकेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. अमरावतीच्या जिल्हाधिका-यांकडे याबाबत तक्रार करण्यात आली आहे. या पुस्तकामुळे शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास लिहिला जात असून शिवाजी महाराजांची चुकीची प्रतिमा मुलांच्या मनामध्ये तयार होऊ शकते असा आरोप तक्रारीमध्ये करण्यात आला आहे. हे पुस्तक तातडीने बाजारातून मागे घ्यावे आणि त्याच्यावर बंदी घालावी अशी मागणी मराठा संघटनांनी केली आहे.

COMMENTS