युतीचं भिजत घोंगड, मात्र शिवसेनेनं एबी फॉर्म वाटले, वाचा कुणाला मिळाले एबी फॉर्म !

युतीचं भिजत घोंगड, मात्र शिवसेनेनं एबी फॉर्म वाटले, वाचा कुणाला मिळाले एबी फॉर्म !

मुंबई – भाजप शिवसेना युतीबाबत अजून निश्चित काहीही नसताना शिवसेनेनं त्यांच्या अनेक उमेदवारांना थेट एबी फॉर्म वाटले आहेत. शिवसेनेनं जरी त्यांच्या आमदारांच्या आणि त्यांच्याकडे असलेल्या जागांवरील उमेदवारांना एबी फॉर्म दिले असले तरी त्यापैकी काही जागांवर भाजपचा दावा होता. त्या मतदारसंघामध्ये भाजपच्या उमेदवारांनी जोरदार तयारी सुरू केली होती. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल विधानसभा मतदारसंघातून  संजय घाटगे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या ठिकाणी भाजपचे समरजितसिंह घाटगे इच्छुक होते. त्यांनी जोरदार तयारीही सुरू केली होती. तर चंदगडची जागा भाजपकडे जाईल अशीही चर्चा होती. पण त्या ठिकाणाहूनही शिवसेनेनंं संग्राम कुपेकर यांना उमेदवारी अर्ज दिला आहे.

कोल्हापूरमधील 10 पैकी 8 मतदारासंघातील उमेदवारांना शिवसेनेनं एबी फॉर्म दिले आहेत. तर दोन जागा भाजपसाठी सोडल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील 10 पैकी जार तरी जागा भाजपला सोडल्या जातील असा अंदाज होता. मात्र तसं झालं नाही. त्यामुळे युतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. दुसरीकडे रत्नागिरी जिल्ह्यातील पाच जागांवरी उमेदवारांना शिवसेनेनं एबी फॉर्म दिले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच या उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत.

शिवसेनेनं कागलमधून संजंय घाटगे, चंदगडमधून संग्राम कुपेकर, कोल्हापूर उत्तर राजेश क्षीरसागर, करवीर – चंद्रदीप नरके, हातकणंगले – डॉ. सुजित मिणचेकर, शाहुवाडी – सत्यजित पाटील, राधानगरी, प्रकाश आबीटकर, शिरोळमधून उल्हास पाटील, रत्नागिरीमधून उदय सामंत, चिपळूनमधून सदानंद चव्हाण, गुहागरमधून भास्कर जाधव,  दापोलीतून योगेश कदम, राजापूरमधून राजन साळवी यांना एबी फॉर्म दिले आहेत. भायखळ्यामधून यामिनी जाधव यांना तिकीट देण्यात आलं आहे.

सावंतवाडीतून दीपक केसरकर, कुडाळमधून वैभव नाईक, औरंगाबाद पश्चिम संजय शिरसाट, अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघातून नितीन देशमुख, उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा मतदारसंघातून ज्ञानराज चौगुले, मालेगाव बाह्यमधून दादा भुसे,  नाशिक जिल्हयातील देवळालीमधून योगेश घोलप, निफाडमधून अनिल कदम, सिन्नरमधून राजाभाऊ वाजे, मुंबईतील अणुशक्तीनगरमधून विद्यमान आमदार तुकाराम काते, चादीवलीतून दिलीप लांडे यांना एबी फॉर्म देण्यात आला आहे. विक्रोळीतून सुनिल राऊत यांना, कुर्ल्यातून मंगेश कुडाळकर, शिवाजीनगर मानखुर्दमधून विट्ठल लोकरे यांना एबी फॉर्म देण्यात आला आहे.

रायगड जिल्ह्यातील महाडमधून विद्यमान आमदार भरत गोगावले यांना तिकीट देण्यात आलं आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर मतदारसंघातून डॉ. संजय रायमुरकर यांना एबी फॉर्म देण्यात आला आहे. जालन्यातून अर्जुन खोतकर यांनाही एबी फॉर्म देण्यात आला आहे. पैठणमधून संदीपान भुमरे यांना तिकीट देण्यात आलं आहे. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी मतदारसंघातून जिल्हा प्रमुख संतोष बांगर, बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा मतदारसंघातून शशिकांत खेडेकर यांना तिकीट देण्यात आले आहे.

 

COMMENTS