माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना शह देण्यासाठी शिवसेना देणार ‘या’ नेत्याला उमेदवारी?

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना शह देण्यासाठी शिवसेना देणार ‘या’ नेत्याला उमेदवारी?

मुंबई – काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात शिवसेना भाजपला चांगलं यश मिळालं. परंतु औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेनेला पराभवाचा फटका बसला. त्यामुळे हा पराभव शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. याठिकाणी पूर्वीचे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यामुळे शिवसेनेचा पराभव झाला असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे जाधव यांना आगामी विधानसभा निवडणुकीत शह देण्यासाठी शिवसेनेकडून मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांना विधानसभेची उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे.

दरम्यान मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मराठा आरक्षणाच्या लढ्याला दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांनी उद्धव ठाकरे यांचे आभार मानले. मराठा आरक्षण मिळवण्यात आणि कोर्टात मराठा आरक्षणाची बाजू झुंझारपणे मांडण्यात पाटील यांची महत्वपूर्ण भूमिका राहिलेली आहे. त्यामुळे पाटील मराठा मतदारांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. याचाच फायदा शिवसेना घेऊ शकते असं बोललं जात आहे. त्यामुळे त्यांच्या या भेटीनंतर शिवसेनेकडून विनोद पाटील यांना कन्नड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे.

COMMENTS