शिवसेना-भाजपकडून स्वबळाची चाचपणी, ‘मातोश्री’वर बैठकांचं सत्र ?

शिवसेना-भाजपकडून स्वबळाची चाचपणी, ‘मातोश्री’वर बैठकांचं सत्र ?

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीत युती करण्याबाबतचा निर्णय शिवसेना-भाजपनं लोकसभा निवडणुकीदरम्यानच घेतला असल्याची चर्चा आहे. परंतु आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या दोन्ही पक्षांमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन धुसफूस सुरु असल्याचं चित्र आहे. त्यामुळ् विधानसभा निवडणुकीसाठी दोन्ही पक्षाकडून स्वबळाचीही चाचपणी सुरु असल्याची माहिती आहे.

राज्यातील सर्व 288 जागा लढण्याबाबत शिवसेनाही स्वबळाची चाचपणी करत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान ‘मातोश्री’वर बैठकांचं सत्र सुरु असल्याची माह्ती सूत्रांनी दिली आहे. उद्धव ठाकरे जिल्हानिहाय राजकीय समीकरणं जाणून घेत आहेत. काल रायगडमधील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आढावा घेतल्यानंतर आज पालघरमधील पदाधिकऱ्यांना ‘मातोश्री’वर पाचारण करण्यात आलं. यावेळी नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून एन्काऊंटर स्पेशालिस्ट पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्याबाबतचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मातोश्रीवरील आजट्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

COMMENTS