विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा मोठा निर्णय!

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा मोठा निर्णय!

मुंबई – आगामी विधानसभा निवड‌णुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात लवकरच एक लाख नव्या शाखाप्रमुखांची नेमणूक केली जाणार आहे. “माझा महाराष्ट्र…भगवा महाराष्ट्र” या अभियानाअंतर्गत राज्याच्या ग्रामीण भागांमध्ये एक लाख शाखाप्रमुखांची नियुक्ती केली जाणार आहे. शिवसेनेच्या वर्धापनदिनी शिवसेनेचे नेते विश्वनाथ नेरुरकर यांनी या अभियानाविषयी सविस्तर माहिती दिली होती. “येत्या 27 जुलैआधी शाखाप्रमुखांच्या नेमणुकीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार असून ही नेमणूक करताना विभागप्रमुखांनी स्वत:चे नातेवाईक नाही तर कट्टर शिवसैनिकांचा विचार करावा, असं उद्धव ठाकरेंचा आदेश असल्याचं नेरुरकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’मध्ये यासंबंधी बातमी देण्यात आली आहे.ग्रामीण भागात 14 ते 27 जुलै या दरम्यान शिवसेना सदस्य नोंदणी अभियान राबवलं जाणार आहे.” आगामी निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. गावांमध्ये भगवं वातावरणं निर्माण करण्यासाठी प्रत्येक प्रभागात शाखाप्रमुखाची नेमणूक केली जाणार आहे. विशेष म्हणजे शाखाप्रमुखांच्या नियुक्तीवेळी कट्टर शिवसैनिकांना प्राधान्य देण्याचा आदेश स्वत: उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

COMMENTS