लोकसभा निवडणूक संपताच शिवसेना-भाजपमध्ये वादाची ठिणगी !

लोकसभा निवडणूक संपताच शिवसेना-भाजपमध्ये वादाची ठिणगी !

पुणे – नाही म्हणत म्हणत भाजपा-शिवसेनेनं लोकसभा निवडणुकीत युती केली. परंतु लोकसभा निवडणूक पार पडून अवघे काही दिवस झाले असतानाच पुन्हा एकदा शिवसेना भाजपमध्ये ठिणगी पडली असल्याचं दिसत आहे. कारण पुणे महापालिकेतील सत्तेमध्ये वाटा मिळण्यावरून दोन्ही पक्षांमध्ये धुसफूस सुरु झाली आहे.
पुणे महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. असं असताना, लोकसभेसाठी युती केली मग आता महापालिकेच्या सत्तेत देखील सहभागी करून घ्या, अशी शिवसेनेनं मागणी केली आहे.

दरम्यान महापालिकेतील विविध विषय समित्या तसेच प्रभाग समित्यांचं अध्यक्षपद मिळावं यासाठी शिवसेना सुरुवातीपासूनच आग्रही आहे. परंतु अजूनपर्यंत शिवसेनेला कोणतही पद देण्यात आलं नाही
त्यामुळे शिवसैनिक नाराज आहेत.

तस्च भाजपकडून शिवसेनेला सत्तेत वाटा देण्यास तयार असल्याचं य स्प्ष्ट करण्यात आलं आहे. परंतु शिवसेनेच्या नेत्यांमध्ये संवाद नसल्यानं त्यांना नेमकी कुठली पदं हवीत याबाबत एकमत नाही तसंच विविध पदांसाठीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याबाबत शिवसेनेकडून प्रतिसाद आला नसल्याचं भाजपनं म्हटलं आहे. त्यामुळे आता याबाबत पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS