महायुतीला आणखी एक धक्का, माजी आमदाराचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा!

महायुतीला आणखी एक धक्का, माजी आमदाराचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा!

पंढरपूर – महायुतीला आणखी एक धक्का, माजी आमदारानं अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. करमाळा विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार आणि भाजप नेते जयवंतराव जगताप यांनी अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे यांना पाठिंबा दिला आहे.
करमाळ्यात महायुतीमधून शिवसेनेचा उमेदवार असतानाही जगताप गट महायुती विरोधात काम करणार असल्यामुळे युतीला मोठा धक्का बसला असल्याचं दिसत आहे.

या मतदारसंघात शिवसेनेने विद्यमान आमदार नारायण पाटील यांचं तिकीट कापून राष्ट्रवादीतून आलेल्या रश्मी बागल यांना तिकीट दिलं. त्यामुळे नाराज नारायण पाटील यांनी शिवसेनेचा राजीनामा देऊन, अपक्ष उमेदवारी दाखल केली. रश्मी बागल यांच्यापुढे आधीच नारायण पाटील यांचं आव्हान असताना, आता संजयमामा शिंदे यांना जयवंतराव जगतापांनी पाठिंबा दिल्याने, रश्मी बागल यांच्यासमोर दुहेरी आव्हान निर्माण झालं आहे.

दरम्यान २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत जयवंतराव जगताप यांनी १४,३४८ मते


घेतली होती. तर संजयमामा शिंदे हे २,२९७ मताने पराभूत झाले होते. करमाळ्यात जगताप गटाची भूमिका नेहमी किंगमेकर अशी राहिलेली आहे. त्यामुळे या निवडणुकीतही त्यांच्या या भूमिकेमुळे भाजपला धक्का बसू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे.

COMMENTS