कोकणात शिवसेना-भाजपमध्ये वादाची ठिणगी, ‘या’ दोन मतदारसंघात भाजप नेत्यांचा अपक्ष अर्ज!

कोकणात शिवसेना-भाजपमध्ये वादाची ठिणगी, ‘या’ दोन मतदारसंघात भाजप नेत्यांचा अपक्ष अर्ज!

मुंबई – भाजप, शिवसेनेनं आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजपने 124 तर शिवसेनेने 70 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. ही यादी जाहीर होताच उमेदवारी न मिळाल्यामुळे काही स्थानिक नेते नाराज झाले आहेत. या नाराजीमुळे काही नेत्यांनी पक्षाला धक्का देत अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे.

रत्नागिरीतील दापोली मतदारसंघात शिवसेना, भाजप युतीमध्ये वादाची ठिणगी पडली असून भाजपाचे केदार साठे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दापोली मतदारसंघातून साठे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. केदार साठे भाजपाचे जिल्हा सरचिटणीस असून हा मतदार संघ शिवसेनेचा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांना देण्यात आला आहे. त्यामुळे साठे नाराज आहेत. तसेच रत्नागिरीमध्ये भाजपच्या वाट्याला एकही मतदारसंघ नसून गुहागर आणि चिपळूण या दोन्ही ठिकाणीही भाजप बंडखोरीच्या तयारीत आहे.

दरम्यान रायगडमध्येही शिवसेना- भाजप युतीमध्ये वादाची ठिणगी पडली असून भाजपाचे महेश बालदी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उरण मतदारसंघातून बालदी यांनी अपक्ष अर्ज दाखल केला असून बालदी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस आहेत. या मतदारसंघात शिवसेनेकडून मनोहर भोईर यांना उमेदवारी देण्यात आली असून याठिकाणी भोईर हे शिवसेनेचे विद्यमान आमदार आहेत.

महेश बालदी

COMMENTS