या मतदारसंघातील निकाल हाती, शिवसेना-भाजपनं गड राखला!

या मतदारसंघातील निकाल हाती, शिवसेना-भाजपनं गड राखला!

मुंबई – विधानसभा निलडणुकीतील काही जागांवरील निकाल हाती आले आहेत.विक्रोळीतून शिवसेनेचे सुनील राऊत विजयी झाले आहेत. तर धुळे शहरातून अनिल गोटे हे विजयी झाले आहे. शिर्डी मतदारसंघातून भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील हे विजयी झाले आहेत.

ठाण्याचा गड शिवसेनेने राखला

ठाण्यात शिवसेनेने आपला गड राखला असून ओवळा-माजीपाडामधून शिवसेनेचे प्रताप सरनाईक आणि कोपरी-पाचपाखाडीमधून एकनाथ शिंदे विजयी झाले आहेत. घाटकोपर पूर्वमधून भाजपाचे पराग शाह विजयी झाले आहेत. भाजपाने यावेळी प्रकाश मेहता यांचे तिकीट कापून पराग शाह यांना उमेदवारी दिली होती.

बोरीवलीतून भाजपाचे सुनील राणे विजयी

बोरीवली विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे सुनील राणे विजयी झाले आहेत. ते वरळीमध्ये राहतात. पण भाजपाने विनोद तावडे यांच्याजागी त्यांना उमेदवारी दिली होती. विनोद तावडे बोरीवलीमधून आमदार होते. पण भाजपाने त्यांचे तिकीट कापले व सुनील राणे यांना उमेदवारी दिली.

COMMENTS