शिवसेनेनं मुंबईकरांना टोप्या लावल्या, मालमत्ता करमाफी नाहीच!

शिवसेनेनं मुंबईकरांना टोप्या लावल्या, मालमत्ता करमाफी नाहीच!

मुंबई – मुंबईतील 500 चौरस फुटापर्यंतच्या सर्व घरांना करमाफी देण्याचं आश्वासन शिवसेनेनं दिलं होतं. परंतु शिवसेनेची ही घोषणा अखेर पोकळ ठरली असून सर्वसाधरण कर वगळून मालमत्ता कराची बिलं लवकरच करदात्यांना पाठवण्यात येणार आहेत. त्यामुळे
500 चौरस फुटापर्यंतचं घर असलेल्यांना 70 टक्के कर भरावा लागणार आहे. त्यामुळे शिवसेनेनं महापालिका निवडणुकीच्या तोंडावर केलेली ही घोषणा पोकळ असल्याचं उघड झालं आहे.

दरम्यान 500 चौरस फुटापर्यंतच्या सर्व घरांना करमाफी देण्याबाबत लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने अधिसूचना जारी केली होती. या अधिसूचनेनुसार मालमत्ता कराच्या देयकातील फक्त सर्वसाधारण कर माफ करण्यात आला. त्यामुळे सर्वसाधारण कर माफ करायचा की संपूर्ण करमाफी करायची याबाबत संभ्रम होता. त्यामुळे करदात्यांना देयके कशी द्यायची असा प्रश्न माहापालिका प्रशासनाला पडला असल्यामुळे व्यावसायिक आणि मोठ्या करदात्यांना मालमत्ता कराची सहामाही देयके पाठवण्यात आली होती. परंतु 500 चौरस फुटापर्यंतच्या करदात्यांना ते पाठवली नव्हती. मात्र आता सर्वसाधारण कर वगळून देयके पाठवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे करमाफीच्या नावाखाली शिवसेनेनं मुंबईकरांना टोप्या लावल्या असल्याचं बोललं जात आहे.

याबाबत निलेश राणे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. ह्या नालायकांच नाव टोपी सेना करून टाका… उद्धव ठाकरे मातोश्री घराचा प्रॉपर्टी टॅक्स भरतात का??? आणि भरत असतील तर तो कर भरायला त्यांचं उत्पन्न कुठून येतं, विचारा अगोदर असं ट्वीट नीलेश राणे यांनी केलं आहे.

COMMENTS