… तर फडणवीस सरकार जाऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकतो – आठवले

… तर फडणवीस सरकार जाऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकतो – आठवले

नाशिक – महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांना भाजपनं राज्यसभेची ऑफर दिल्याची चर्चा सुरू आहे. त्यांना राज्यमंत्रिमंडळात घेण्याबाबत अडचण असल्यामुळेच त्यांना राज्यसभेची ऑफर दिल्याचंही बोललं जातंय. मात्र नारायण राणे यांना राज्यमंत्रिमंडळ समावेश केल्यास शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल अशी भिती भाजपला वाटत आहे. कोणतेती अदृश्य हात भाजपला मदत करणार नाहीत. उलट दोन्ही काँग्रेसच्या मदतीने शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकतो. त्यामुळेच राणेंना भाजप मंत्रिमंडळात घेत नसावा असा अंदाज केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे.

त्यामुळे आश्वासन देऊनही भाजप राणेंना मंत्रिमंडळात घेऊ शकत नाही. त्यामुळे राणेंनी राज्यसभेची ऑफर स्विकारावी आणि भाजपने केंद्रात नारायण राणे यांना मंत्री करावे अशी सूचनाही रामदास आठवले यांनी केली आहे. दरम्यान शिवसेनेनं विरोध केल्यामुळे तर राणेंना मंत्रिमंडळात घेण्यास भाजप नाखुश आहे. त्याशिवाय ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हेही नाराज होतील अशी भीती भाजपला आहे. त्यामुळेच राज्यमंत्रिमंडळात त्यांचा समावेश केला जात नसल्याचं बोललं जातंय.

COMMENTS