कोरोनामुळे शिवसेना नगरसेवकाचा मृत्यू !

कोरोनामुळे शिवसेना नगरसेवकाचा मृत्यू !

मुंबई – राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. राज्यात काल 2 हजार 553 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यातील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा 88 हजार 528 वर पोहोचला आहे. यापैकी एकूण 40 हजार 975 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात 44 हजार 374 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

दरम्यान मिरा भाईंदर महापालिकेतील शिवसेना नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ठाण्याच्या वेदांत हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना नगरसेवक हरिश्चंद आंमगावकर यांची प्राणज्योत मालवली आहे.
आमदार प्रताप सरनाईक यांचे अत्यंत विश्वासू म्हणून त्यांची ओळख होती. ते मिरा भाईंदर महानगरपालिकेत दोन वेळा निवडून आले होते. या अगोदर त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्षपद देखील भूषवले होते. सध्या ते महानगरपालिकेत शिवसेनेचे गटनेते म्हणून कार्यरत होते.

दरम्यान एका आठवड्यापूर्वीच या नगरसेवकासह त्यांची आई, पत्नी आणि भाऊ यांनादेखील कोरोनाची लागण झाली होती. उपचारानंतर त्यांच्या पत्नीला डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांचे भाऊ आणि आई हे अद्यापही वेदांत हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

COMMENTS