शिवसेनेच्या माजी आमदाराचा राष्ट्रवादीत प्रवेश, लोकसभेची उमेदवारी मिळणार ?

शिवसेनेच्या माजी आमदाराचा राष्ट्रवादीत प्रवेश, लोकसभेची उमेदवारी मिळणार ?

नाशिक – नाशिकमध्ये शिवसेनेला जोरदार धक्का बसला असून शिवसेनेचे माजी आमदार धनराज महाले यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला आहे. मनमाड येथे राष्ट्रवादीच्या परिवर्तन यात्रेदरम्यान त्यांनी आज शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादीचं घड्याळ हातावर बांधलं आहे. यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते.

दरम्यान धनराज महाले यांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केली होती. शिवसेनेनं एकला चलोची हा दिल्यामुळे आपल्याला या मतदारसंघातून उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा त्यांना होती. परंतु पुन्हा शिवसेना-भाजपमध्ये युती होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे त्यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. आता राष्ट्रवादीकडून दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी महाले यांना उमेदवारी दिली जाणार का ? हे पाहणं गरजेचं आहे.

COMMENTS