मातोश्रीवर शिवसेना नेत्यांची महत्त्वाची बैठक !

मातोश्रीवर शिवसेना नेत्यांची महत्त्वाची बैठक !

मुंबई – मोतोश्रीवर शिवसेना नेत्यांची महत्त्वाची बैठक उद्धव ठाकरे यांनी बोलावली असून सध्या ही बैठक सुरु आहे. या बैठकीला मनोहर जोशी, सुभाष देसाई, दिवाकर रावते संजय राऊत, अनिल परब, रामदास कदम, गजानन कीर्तिकर आणि अन्य नेते, पदाधिकारी उपस्थित आहेत. 23 जानेवारीला म्हणजे उद्या शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत संघटनात्मक निवडणुका होणार आहेत. यावेळी काही फेरबदल होण्याची शक्यता आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी बैठक बोलवली असल्याची शक्यता वर्तवली जात असून काही महत्त्वाचे ठरावही कार्यकारी बैठकीत मंजूर केले जाणार आहेत.

COMMENTS