“शिवसेना वेगळी लढणार ही तर भाजपसाठी चांगली संधी !”

“शिवसेना वेगळी लढणार ही तर भाजपसाठी चांगली संधी !”

नागपूर – विधानसभा आणि लोकसभेत शिवसेनेनं वेगळी निवडणूक लढवली तर ती भाजपसाठी चांगली संधी असल्याचं वक्तव्य भाजपचे बंडखोर आमदार आशिष देशमुख यांनी केलं आहे. लोकसभेत आणि विधानसभेत वेगळी निवडणूक लढवण्याची घोषणा शिवसेनेनं केल्यानंतर आशिष देशमुख यांनी हे वक्तव्य केलं आहे.

दरम्यान यावेळी बोलत असताना त्यांनी स्वतंत्र विदर्भाचीही मागणी सरकारकडे केली आहे. 30 वे राज्य म्हणून स्वतंत्र विदर्भ राज्य जाहीर करा. शेवटी विदर्भात सर्वात जास्त आमदार भाजपाचेच निवडून आले आहेत असं वक्तव्य आशिष देशमुख यांनी केलं आहे. तसेच केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असताना आता भाजपने पुढे जात निर्णय घ्यावा असा सल्लाही देशमुख यांनी दिला आहे.

COMMENTS