शिवसेनेला मोठा धक्का, ‘या’ नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश!

शिवसेनेला मोठा धक्का, ‘या’ नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश!

मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. सावंतवाडीचे नगराध्यक्ष आणि दीपक केसरकर यांचे कट्टर समर्थक बबन साळगावकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत साळगावकर यांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. बबन साळगावकर हे आगामी विधानसभा निवडणुकीत सावंतवाडी मतदारसंघातून दीपक केसरकर यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे उमेदवार असणार आहेत. त्यामुळे शिवसेना नेते आणि मंत्री दीपक केसरकर यांच्याविरोधात राष्ट्रवादीने मोठी खेळी खेळली असल्याचं दिसत आहे.

दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी शिवसेना-भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आघाडीला मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा होती. परंतु अशातच आता निवडणूक तोंडावर आली असताना शिवसेना-भाजपमधील अनेक नेते आघाडीत जात आहेत. तसेच आणखी काही नेते आघाडीत येतील असा दावा काँग्रेस -राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून केला जात आहे.

COMMENTS