शिवसेनेच्या तालुका उपप्रमुखाची हत्या, मृतदेह दिला पेटवून !

शिवसेनेच्या तालुका उपप्रमुखाची हत्या, मृतदेह दिला पेटवून !

भिवंडी – काही दिवसांपूर्वीच अहमदनगरमध्ये दोन शिवसैनिकांची  हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच भिवंडी तालुक्यातील शिवेसनेच्या तालुका उपप्रमुखाची हत्या करण्यात आली आहे. शैलेश निमसे असं या शिवसैनिकाचं नाव आहे. भिवंडी तालुक्यातील दिघाशी जवळील देवचोळा येथे निमसे यांची निर्घृण हत्या करण्यात आली. आली असून धक्कादायक म्हणजे, निमसेंच्या हत्येनंतर त्यांची ओळख पटू नये यासाठी त्यांचा मृतदेह पेटवण्यात आला होता. या घटनेमुळे मुंबईत खळबळ माजली आहे.

दरम्यान हत्येच कारण मात्र अजून समजू शकलं नसून निमसे यांचा मृतदेह भिवंडी उपजिल्हा रुग्णालयातून शवविच्छेदनासाठी जे. जे. रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच अहमदनगर जिल्ह्यात दोन शिवसैनिकांची राजकीय वादातून हत्या झाली आहे. त्यानंतर अवघ्या काही दिवसातच भिवंडीत शिवसैनिकांच्या हत्येचं प्रकरण समोर आले आहे. तसेच ही हत्या कोणी केली आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

 

COMMENTS