शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांना अटक !

शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांना अटक !

रत्नागिरी- राजापूरमधील लांजाचे शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांना अटक करण्यात आली आहे. रिफायनरीविरोधात  तीव्र आंदोलन केल्यामुळे त्यांना राजापूर पोलीसांनी अटक केली आहे.तसेच पंचायत समिती सभापती सुभाष गुरव, उपसभापती अश्विनी शिवणेकर, तालुका प्रमुख प्रकाश कुवळेकर यांच्यासह प्रमुख पदाधिका-यांना अटक करण्यात आली आहे. या आंदोलनादरम्यान राजन साळवी यांनी सरकारचा प्रतिकात्मक प्रतिकात्मक पुतळा झाला होता. आदेशाचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान शिवसेनेसह विरोधी पक्षांनी नाणार प्रकल्पाला विरोध केला आहे. कोणत्याही परिस्थितीत रत्नागिरी नाणार प्रकल्प होऊ देणार नसल्याची भूमिका उद्धव यांनी घेतली आहे. त्यानंतर आक्रमक भूमिका घेत राजन साळवी यांनी नाणारला विरोध करत आज जोरदार आंदोलन केलं होतं. या आंदोलनात अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्या आला होता. त्यानंतर पोलिसांनी साळवी यांना अटक करण्यात आली आहे.

COMMENTS