शिवसेनेचे 15 ते 20 आमदार भाजपच्या संपर्कात?, सर्व आमदारांना याठिकाणी हलवले!

शिवसेनेचे 15 ते 20 आमदार भाजपच्या संपर्कात?, सर्व आमदारांना याठिकाणी हलवले!

मुंबई – राज्यात सत्तास्थापन करण्यावरुन
राज्यात वेगवान घडामोडी घडत आहेत. राज्यात भाजपकडून बहुमतासाठी ऑपरेशन लोटस सारखी मोहीम आखली जात असल्याचं समोर येत आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे काही आमदार भाजपसोबत जाण्याच्या भीतीनं त्यांच्यावर करडी नजर ठेवण्यात आली आहे. असं असलं तरीही शिवसेनेच्या गोटातून खळबळ उडवणारी मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेनेचे 15 ते 20 आमदार देवेंद्र फडणवीस सरकारला पाठिंबा देण्यासाठी तयार असल्याचं समोर आलं आहे.

दरम्यान फोडाफोडीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून खबरदारी घेतली जात आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांना रेनेसन्स हॉटेलमधून हयात हॉटेलला हलवण्यात आले आहे तर शिवसेना आमदारांना ललितमधून हॉटेल लेमन ट्रीमध्ये ठेवण्यात आले आहे. काँग्रेस आमदारांना जे डब्ल्यू मॅरियट हॉटेलमध्ये ठेवण्यात आले असल्याची माहिती आहे.

दरम्यान आमदारांना फोडण्यासाठी कुठलाही प्रयत्न होऊ नये, पक्षाला कुठलाही दगाफटका होऊ नये यासाठी शिवसेना खबरदारी घेत आहे. दरम्यान, भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेनं कोणतीही किंमत मोजण्याची तयारी दाखवलीय. त्यासाठी शिवसेनेनं पाच वर्षे मुख्यमंत्रिपदाचा आग्रह सोडण्याची तयारी दर्शवल्याची माहिती आहे.

COMMENTS