गुजरातींना जमिनी मिळवून देणारे शिवसेनेचे एजन्ट, निलेश राणेंचा हल्लाबोल !

गुजरातींना जमिनी मिळवून देणारे शिवसेनेचे एजन्ट, निलेश राणेंचा हल्लाबोल !

मुंबई :  कोकणात सध्या रत्नागिरी जिल्ह्यात प्रस्तावित असलेल्या नाणार प्रकल्पवारुन जोरदार वाद सुरू आहे. या प्रकल्पाला स्थानिकांनी जोरदार विरोध केला आहे. या प्रकल्पावरुन सध्या कोकणातलं राजकीय वातावरणही चांगलच तापलं आहे. एककीडं मंत्रिमंडळानं या प्रकल्पाला हिरवा कंदिल दाखवला असतना, स्थानिक पातळीवर मात्र शिवसेना या प्रकल्पाला विरोध करत आहेत.

काल शिवसेनेना खासदार विनायक राऊत यांनी या प्रकरणावरुन भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. गुजरातमधील लँन्ड माफियांनी हजारो हेक्टर जमीनी घेतल्याचा आरोप करत त्यांना फायदा होण्यासाठीच या प्रकल्पाचा घाट घातला जात असल्याचा आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला आहे.

विनायक राऊत यांच्यावर आज माजी खासदार निलेश राणे यांनी या प्रकरणावरुन हल्लाबोल केला आहे. या प्रकरणात शिवसेनेची दुटप्पी भूमिका असल्याचा आरोप राणे यांनी केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात गुजराती लोकांना जमीन विकताना शिवसेनेच्या नेत्यांनी एजन्ट म्हणून काम केल्याचा आरोप राणे यांनी केला आहे. शिवसेनेच्या मदतीशिवाय तिथे जमीन घेणं शक्यच नाही असा आरोपही राणे यांनी केला आहे. इतके दिवस विनायक राऊत झोपले होते का ? असा सवालही राणे यांनी केला आहे.

स्थानिकांचा विरोध असेल तर हा प्रकल्प होऊ देणार नाही असा शब्द उद्धव ठाकरेंनी दोनवेळा ग्रामस्थांना दिला होता. मात्र त्यांना ते आश्वासन पाळता आलं नाही. त्यामुळेच आता हे पाप भाजपच्या माथी मारण्याचा शिवसेनचा प्रयत्न असल्याचा आरोपही निलेश राणे यांनी केला आहे.

COMMENTS