मराठा आरक्षणाबाबत वक्तव्य करू नका, हर्षवर्धन जाधव यांना शिवसेनेची ताकीद !

मराठा आरक्षणाबाबत वक्तव्य करू नका, हर्षवर्धन जाधव यांना शिवसेनेची ताकीद !

मुंबई –  गेले दोन दिवस मुंबईत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन करणाऱ्या हर्षवर्धन जाधव यांना एकनाथ शिंदे यांनी ताकीद दिली आहे. मराठा आरक्षणाबाबत वक्तव्य करू नका असा एकनाथ शिंदे यांनी हर्षवर्धन जाधव यांना फोनवरून निरोप दिला असल्याची माहिती आहे. हर्षवर्धन जाधव यांची, वेगवेगळी वक्तव्य आणि भूमिकांमुळे पक्ष अडचणीत येत असल्याने जाधव यांना शिवसेनेकडून समज दिली असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान राज्यात सुरु असलेल्या मराठा आरक्षणाबाबतच्या आंदोलनाला पाठिंबा देत हर्षवर्धन जाधव यांनी राजीनामा दिला आहे. यानंतर काल ते मातोश्रीवर गेले असता उद्धव ठाकरे यांनी त्यांची भेट नाकारली होती. त्यानंतर आरक्षणाच्या मागणीवरुन त्यांनी कालपासून मुंबईमध्ये धरणे आंदोलन सुरु केलं आहे. ते घेत असलेल्या या भूमिकांमुळे पक्ष अडचणीत येत असल्याचं कारण देत शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी हर्षवर्धन जाधव यांना समज दिली आहे. मराठा आरक्षणाबाबत वक्तव्य करू नका असा एकनाथ शिंदे यांनी हर्षवर्धन जाधव यांना फोनवरून निरोप दिला असल्याची माहिती आहे.

COMMENTS