देशातील सर्वच राजकीय पक्षांना शिवसेनेनं टाकलं मागे !

देशातील सर्वच राजकीय पक्षांना शिवसेनेनं टाकलं मागे !

मुंबई – देशातील सर्वच राजकीय पक्षांना शिवसेनेनं मागे टाकलं असून शिवसेना हा सर्वात श्रीमंत पक्ष ठरला आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्सच्या (एडीआर) आकडेवारीनुसार 2016-17 या आर्थिक वर्षात शिवसेनेला तब्बल 25.65 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. शिवसेनेनंतर दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्ष दुस-या क्रमांकावर आहे. तर तिस-या क्रमांकावर पंजाबमधील शिरोमणी अकाली दल हा पक्ष आहे. आम आदमी पक्षाला 3 हजार 865 देणगीदारांकडून 24.75 कोटी रुपयांची देणग्या मिळाल्या आहेत. तर पंजाबमधील शिरोमणी अकाली दलाल या पक्षाला 2016-17 या आर्थिक वर्षात 15.45 कोटी रुपयांची रक्कम देणगी स्वरुपात मिळाली आहे.

दरम्यान शिवसेना देशभरात श्रीमंत राजकीय पक्ष ठरला असला तरी, 2015-16 च्या तुलनेत शिवसेनेला मिळालेल्या देणग्यांच्या रकमेत 70 टक्क्यांची घट झाली आहे. 2015-16 मध्ये शिवसेनेला 61.19 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या होत्या. यावर्षी मात्र देणगीमध्ये घट झाली असली तरी शिवेसेना मात्र अव्वलस्थानी आहे.

COMMENTS