विरोधकांच्या ‘त्या’ मागणीला शिवसेनेचा पाठिंबा !

विरोधकांच्या ‘त्या’ मागणीला शिवसेनेचा पाठिंबा !

नवी दिल्ली – ईव्हीएम मशीनद्वारे मतदान न घेता मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची मागणी अनेकवेळा विरोधकांकडून केली जात आहे. विरोधकांच्या या मागणीला आता शिवसेनेनही पाठिंबा दर्शवला आहे. इतर प्रगत देशात मतपत्रिका वापरल्या जातात. त्यामुळे ईव्हीएमद्वारे नको तर मतपत्रिकेद्वारेच मतदान प्रक्रिया करावी, अशी मागणी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे.

दरम्यान गेली अनेक दिवसांपासून ईव्हीएम मशीनवर प्रश्नचिन्ह उपस्थित करुन विरोधकांनी ईव्हीएमद्वारे मतदार प्रक्रिया बंद करण्याची मागणी केली आहे. ईव्हीएम मशीनद्वारे घोळ केला जात असल्याचा आरोप विरोधकांनी भाजपवर केला आहे. अशातच आता शिवसेनेनंही विरोधकांच्या या मागणीला पाठिंबा दिला असून शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी ईव्हीएमद्वारे मतदान न घेता मतपत्रिकेद्वारे घ्या अशी मागणी केली आहे. त्यामुळे याबाबत केंद्र सरकार काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलं आहे.

 

COMMENTS