“शिवसेनेचं नुकसान होईल म्हणणा-यांनी मेंदूचा उपचार करावा, 2019 ला भाजपच शिवसेनेचा नंबर एकचा शत्रू !”

“शिवसेनेचं नुकसान होईल म्हणणा-यांनी मेंदूचा उपचार करावा, 2019 ला भाजपच शिवसेनेचा नंबर एकचा शत्रू !”

पिंपरी-चिंचवड – भाजपची साथ सोडली तर शिवसेनेचे नुकसान होईल असा दावा करणाऱ्यांच्या मेंदूचा उपचार केला पाहिजे असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. शिवसेनेनं भाजपची साथ सोडून लोकसभेत आणि विधानसभेत स्वतंत्र निवडणूक लढवली तर ५ खासदारही निवडून आणणं मुश्कील होईल असं वक्तव्य भाजपचे खासदार संजय काकडे यांनी केलं होतं. पिंपरी-चिंचवडमध्ये बोलत असताना संजय काकडे यांना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

दरम्यान 2014 मध्ये भाजपने युती तोडली होती, त्यानंतरही शिवसेनेने 63 आमदार निवडून आणले, जे दावा करतायेत त्यांनी पुण्यात बरीच इस्पितळे आहेत तिथे जाऊन इलाज करावा असं राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडावे ही अमित शहा यांची ऑफ द रेकॉर्ड भूमिका असून त्यावर बोलणे अयोग्य असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच  2019 ला भाजप हाच शिवसेनेचा नंबर एकचा शत्रू असणार असल्याचा दावाही संजय राऊत यांनी केला आहे.

COMMENTS