पक्षाने कारवाई केली तरी विरोधातच काम करु, शिवसैनिकांचा उद्धव ठाकरेंसमोर निर्धार !

पक्षाने कारवाई केली तरी विरोधातच काम करु, शिवसैनिकांचा उद्धव ठाकरेंसमोर निर्धार !

मुंबई –  आगामी लोकसभा निवडणूक अगदी तोंडावर आली आहे.परंतु शिवसेना-भाजप युतीचा तिढा अजून काही सुटलेला नाही. आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह पुण्याच्या दौ-यावर होते. यादरम्यान ते युतीबाबत घोषणा करतील अशी शक्यता होती. परंतु आजच्या कार्यक्रमादरम्यान युतीबाबत भाजपच्या नेत्यांनी ब्र ही काढला नाही. एवढच नाही तर लोकसभेच्या 48 जागा लढवण्याचे संकेत भाजप नेत्यांनी दिले आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपच्या युतीचा तिढा अजून सुटला नाही.

अशातच आज ईशान्य मुंबई मतदारसंघातील शिवसैनिकांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यादरम्यान त्यांनी काहीही सांगा पण किरीट सोमय्यांचं काम करायला सांगू नका अशी विनवणी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

तसेच जरी युती झाली तरी आम्ही किरीट सोमय्यांचं काम करणार नाही असंही या शिवसैनिकांनी सांगितलं आहे. तसेच  पक्षाने कारवाई केली तरी विरोधातच काम करु असा निर्धारही कार्यकर्त्यांनी ठाकरेंसमोर केला आहे.

दरम्यान सोमय्या हेच युतीचे उमेदवार झाले तर एकही शिवसैनिक त्यांना मतदान करणार नाही, प्रत्येक शिवसैनिक त्यांच्या विरोधातच काम करील असा निर्धार शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्यांपुढे केला आहे. त्यामुळे युती झाली तर ईशान्य मुंबईचा हा तिढा उद्धव ठाकरे कसा सोडवणार हे पाहणं गरजेचं आहे.

COMMENTS