सातारा लोकसभेची उमेदवारी श्रीनिवास पाटलांना, शरद पवार, श्रीनिवास पाटलांचा एकाच गाडीतून प्रवास ?

सातारा लोकसभेची उमेदवारी श्रीनिवास पाटलांना, शरद पवार, श्रीनिवास पाटलांचा एकाच गाडीतून प्रवास ?

सातारा  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून सातारा लोकसभेची उमेदवारी श्रीनिवास पाटील यांना दिली जाणार असल्याची पुन्हा एकदा सुरु झाली आहे. त्याचं कारण म्हणजे शरद पवार आणि श्रीनिवास पाटील यांनी आज एकाच गाडीतून प्रवास केला आहे. त्यामुळे याबाबत पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि श्रीनिवास पाटील एकाच गाडीतून आले होते.त्यामुळे पुन्हा एकदा श्रीनिवास पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू झाली असून उदयनराजे यांची मात्र डोकेदुखी वाढली असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान श्रीनिवास पाटील साताऱ्यातून खासदारकीसाठी इच्छुक असल्याची माहिती आहे. तसेच त्यांचे आणि शरद पवारांचे जवळीकतेचे संबंध आहेत. त्यामुळे सातारा लोकसभेची जागा श्रीनिवास पाटील यांना दिली जाऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु उदयनराजे यांच्या उमेदवारीला कुणीही विरोध केलेला नाही, आम्ही खेळीमेळीच्या वातावरणात अंतिम निर्णय घेऊ असं शरद पवारानी सांगितलं होतं. मात्र आज शरद पवार आणि श्रीनिवास पाटील एकाच गाडीतून आल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.  त्यामुळे शरद पवारांच्या मनात वेगळं काही सुरु नाही ना असा सवाल आता राजकीय वर्तुळात केला जात आहे.

 

COMMENTS