Exit poll –  ‘या’ सहा राज्यात भाजपचं वर्चस्व कायम ?

Exit poll – ‘या’ सहा राज्यात भाजपचं वर्चस्व कायम ?

नवी दिल्ली नवी दिल्ली – लोकसभा निवडणूक 2019 मधील सातव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया आज अखेर संपली आहे. लोकसभा निवडणुकीतील सर्व उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झालं आहे. मतदानानंतर आता निकाल कोणाच्या बाजूनं लागणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. लोकसभा निवडणूक 2019 मध्ये कोणता पक्ष सत्तेच्या खुर्चीत विराजमान होणार? याचे निकाल 23 मे रोजी स्पष्ट होणार आहेत. परंतु त्यापूर्वी विविध संस्था आणि न्यूज चॅनल्सनी एक्झीट पोल जाहीर केले आहेत. या एक्झिट पोलनुसार पुन्हा एकदा भाजपचं सरकार येणार असल्याचं दिसत आहे.

दरम्यान 2014मध्ये भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला होता. त्यात काही राज्यात भाजपने पूर्ण बहुमत मिळवले होते. 2014च्या प्रमाणेच यंदा देखील मध्य प्रदेश, राजस्थान, गोवा, गुजरात, महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये भाजपाचं वर्चस्व कायम राणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

 

आज तक या वृत्तवाहिनीच्या एक्झिट पोल

 

मध्य प्रदेश

एकूण जागा 29

भाजप 26-28

काँग्रेस 1-3 जागा

 

छत्तीसगड

एकूण 11 जागा

भाजप – 7-8 जागा

काँग्रेस 3-4 जागा

 

राजस्थान

एकूण 25 जागा

भाजप 23-25 जागा

काँग्रेस 0-2 जागा

 

महाराष्ट्र

एकूण 48 जागा

भाजप-सेना 38-42 जागा

आघाडी 6-10 जागा

 

गोवा

एकूण 2 जागा

भाजप 2 जागा

 

गुजरात

एकूण 26 जागा

भाजप 25-26 जागा

काँग्रेस 0-1 जागा

COMMENTS