नाशिक – स्मार्ट शहराची स्मार्ट वाहतूक, नियम तोडाल तर दंड, जाणून घ्या स्मार्ट नियम !

नाशिक – स्मार्ट शहराची स्मार्ट वाहतूक, नियम तोडाल तर दंड, जाणून घ्या स्मार्ट नियम !

स्मार्ट नाशिकमध्ये वाहतूक नियंत्रणाचे पर्यांयही स्मार्ट होत असून त्याचाच एक भाग म्हणून वाहतूक पोलिसांनी त्र्यंबकरोडला सिबल हॉटेल चौकातील सिग्नलवर पिवळ्या रंगाचे चौकोनी पट्टे ओढले आहेत. यलो नेट अर्थातच नो व्हेहिकल स्टॉपिंग झोन येथे तयार करण्यात आला आहे. याचा अर्थ हिरवा सिग्नल संपून सुरू झालेला पिवळा सिग्नल असेल, तोपर्यंतच या पिवळ्या चौकटींवर वाहनधारकाला जाता येईल. मात्र एकदा का लाल सिग्नल लागला आणि वाहनधारक पिवळ्या चौकटींवर आला, तर त्याला दंडाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल.‍

सध्या अनेक वाहनधारक पिवळा किंवा लाल सिग्नलनंतरही झेब्रा क्रॉसिंगवर किंवा त्यापुढे वाहने उभी करतात. मात्र यलो नेट मुळे सर्रास कारवाई होणार असल्याचे आता सिग्नल पाळला जाऊन वाहतुकीला शिस्त येणार आहे. नाशिकमध्ये हा पहिलाच प्रयोग आहे. वाहतुक नियंत्रक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त अजय देवरे हे अभ्यास दौऱ्यावर बंगळूरू येथे गेले असताना तेथील धर्तीवर ही पद्धती नाशिकला राबविण्याचा विचार करून त्र्यंबक रस्त्यापासून त्याची सुरूवात केली आहे.

यानंतरच्या काळात दंडाच्या ई पावत्या, वाहतुक पोलिसांच्या गळ्यात वॉर्न कॅमेरे, अशा अनेक आधुनिक गोष्टी नाशिकच्या वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी केल्या जाणार आहेत. स्मार्ट शहरांमध्ये समावेश झालेल्या नाशिकमध्ये या स्मार्ट वाहतुक नियोजनाला महत्त्व प्राप्त झाले आहे. दरम्यान सहायक आयुक्त श्री देवरे यांनी  सांगितले की आगामी काळात शहरातील सिग्नल चौकात अशाच प्रकारचे यलो नेट रंगविण्यात येणार असून लोकांमध्ये जनजागृती करून वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्ही नाशिककरांनाही या उपक्रमात सहभागी करून घेणार आहोत.

COMMENTS