श्रीलंकेत आणखी एक राजकीय संकट, दोन्ही पक्षातील खासदारांमध्ये तुंबळ हाणामारी !

श्रीलंकेत आणखी एक राजकीय संकट, दोन्ही पक्षातील खासदारांमध्ये तुंबळ हाणामारी !

श्रीलंका – श्रीलंकेतील राजकीय संकट काही थांबता थांबत नसल्याचं दिसत आहे. राजपक्षे सरकारविरोधात काल संसदेत अविश्वास प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर आज दोन्ही पक्षातील खासदारांमध्ये हाणामारी झाली आहे. आज संसदेचे कामकाज सुरु होताच अध्यक्ष करु जयसूर्या यांनी देशामध्ये सरकार अस्तित्वात नसल्यामुळे कोणीही पंतप्रधान नसल्याचं जाहीर केले. त्यावरुन हा राडा झाला असून संसदेतच राजपक्षे समर्थक आणि विरोधक खासदार आपसातच भिडले होते. दोन्ही बाजूंच्या खासदारांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. संसदेच्या अध्यक्षांना आवाजी मतदानाच्या बळावर आपल्याला पंतप्रधानपदावरुन हटवण्याचा अधिकार नाहीय असा महिंदा राजपक्षे यांनी दावा केला आहे.

दरम्यान संसद अध्यक्ष करु जयसूर्या यांनी देशामध्ये सरकार अस्तित्वात नसल्यामुळे कोणीही पंतप्रधान नसल्याचं जाहीर केल्याच्या महिंदा राजपक्षे यांनी आक्षेप घेतला आहे. मतदान झाले पाहिजे पण इतका महत्वाचा प्रस्ताव आवाजी मतदानाने मंजूर करु नये. संसद अध्यक्ष जयसूर्या यांना पंतप्रधान नियुक्त करण्याचा किंवा काढून टाकण्याचा अधिकार नसल्याचं राजपक्षे यांनी म्हटलं आहे.

त्यांच्या या वक्तव्यानंतर राजपक्षे यांचे समर्थन करणारे खासदार सभागृहाच्या मध्यभागी जमले. काहींनी जोरदार घोषणाबाजी करत अध्यक्षांच्या आसनाच्या दिशेने धाव घेतली. त्यानंतर दोन्ही बाजूंच्या खासदारांमध्ये लाथा-बुक्क्यांनी तुंबळ हाणामारी झाली. काही खासदारांनी पाण्याच्या बाटल्या, पुस्तके अध्यक्षांच्या दिशेने फेकून मारली. त्यानंतर सभागहाचं कामकाज तहकूब करण्यात आलं. आजच्या या घटनेमुळे श्रीलंकेच्या संसदेत पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलं असल्याचं पहावयास मिळालं आहे.

 

COMMENTS