एसटी कर्मचारा-यांचा संप अखेर मिटला !

एसटी कर्मचारा-यांचा संप अखेर मिटला !

मुंबई – गेली दोन दिवस सुरू असलेल्या एस टी कर्मचा-यांचा अघोषित संप अखेर मिटला आहे. तशी घोषणा थोड्यावेळापूर्वी मान्यताप्राप्त संघटनांनी मुंबईत केली. संप मिटवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली. त्यांच्या मध्यस्थीनंतर मान्यताप्राप्त संघटनेच्या प्रतिनिधींची आज दुपारी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्यासोबत बैठक झाली. त्यानंतर संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

मान्यताप्राप्त संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे,  सरचिटणीस हनुमंत ताटे, एसटी कामगार सेनेचे हिरेन रेडकर, इंटकचे मुकेश तिगोटे, कास्ट्राईब संघटनेचे निरभवणे इंटकचे श्रीरंग बरगे हे रावते यांच्यासोबतच्या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीनंतर रात्री उशीरा कामगार संघटनेच्या प्रतिनिधींनी संप मागे घेत असल्याची घोषणा केली. कर्मचा-यांना योग्य तो न्याय दिला जाईल असं आश्वासन दिवाकर रावते यांनी दिलं आहे. कर्मचा-यांनी अचानक सुरु केलेल्या संपामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले.

COMMENTS