विधानसभेच्या आखाड्यात भाऊ-बहिण, चुलता-पुतण्या तर सख्ख्या भावांमध्ये लढत, वाचा सविस्तर!

विधानसभेच्या आखाड्यात भाऊ-बहिण, चुलता-पुतण्या तर सख्ख्या भावांमध्ये लढत, वाचा सविस्तर!

मुंबई – विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष जोरदार तयारी करत आहे. अनेक नेत्यांनी पक्षांतर करत दुसय्रा पक्षाचा झेंडा हाती घेतला आहे. त्यामुळे काही मतदारसंघात आपल्या घरातील सदस्य तसेच काही ठिकाणी नातेवाईक आमनेसामने आले आहेत. त्यामुळे यंंदाची निवडणूक चांगलीच गाजणार असल्याचं दिसत आहे. परळी मतदारसंघातील धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे भाऊ-बहिण पुन्हा एकदा आमनेसामने आहेत. त्यांच्याबरोबरच इतरही काही मतदारसंघात अशीच लढत पहायला मिळत आहे.

बीड विधानसभा मतदारसंघात चुलते- पुतणे आमनेसामने

दरम्यान बीड विधानसभा मतदारसंघात जयदत्त क्षीरसागर हे शिवसेनेकडून निवडणूक लढवत आहेत. तर त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादीवाकडून मैदानात आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्यातील या चुलते-पुतण्याची लढत राज्याला पहायला मिळणार आहे.

पुसद विधानसभा मतदारसंघात चुलत भाऊ मैदानात

तसेच यवतमाळमधील पुसद विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून इंद्रनील नाईक हे मैदानात आहेत. तर त्यांच्या विरोधात निलय नाईक हे राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत आहेत. इंद्रनील नाईक आणि निलय नाईक हे दोघं चुलत भाऊ असून या निवडणुकीसाठी ते आमनेसामने आहेत.

लातूरमधील निलंगा मतदारसंघात चुलते, पुतणे आमनेसामने

तसेच लातूरमधील निलंगा मतदारसंघात संभाजी पाटील निलंगेकर हे भाजपकडून निवडणूक लढवत आहेत. तर अशोक पाटील निलंगेकर हे काँग्रेसकडून मैदानात आहेत. या दोघांचं नातं चुलत्या पुतण्याचं असून या निवडणुकीसाठी ते आमनेसामने आहेत.

लाताय्रातील माण मतदारसंघात सख्ख्या भावात लढत

दरम्यान साताय्रातील माण मतदारसंघात
जयकुमार गोरे हे भाजपकडून निवडणूक लढवत आहेत. तर शेखर गोरे हे शिवसेनेतून निवडणुकीच्या मैदानात आहे. हे दोघही संख्खे बंधू असून या मतदारसंघात शिवसेना भाजपमध्ये मैत्रिपूर्ण लढत होत आहे. त्यामुळे या लढतीकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS