मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी सुबोध जयस्वाल तर पोलीस महासंचालकपदी दत्ता पडसलगीकर यांची नियुक्ती !

मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी सुबोध जयस्वाल तर पोलीस महासंचालकपदी दत्ता पडसलगीकर यांची नियुक्ती !

मुंबई – मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी सुबोध जयस्वाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर यापूर्वी पोलीस आयुक्त असणारे दत्ता पडसलगीकर यांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या आधी सुबोध जयस्वाल हे भारतीय गुप्तचर यंत्रणेमध्ये कार्यरत होते. महाराष्ट्राचे पोलीस प्रमुख सतीश माथूर आज निवृत्त होत असून त्यांच्या जागी दत्ता पडसलगीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान वादग्रस्त अधिकारी म्हणून  सुबोध जयस्वाल यांची ओळख आहे. तेलगी प्रकरणात त्यांच्या कामाबद्दल संशय व्यक्त करण्यात आला होता. सुप्रीम कोर्टाने आर एस शर्मा यांना क्लीनचिट दिली तेव्हा जयस्वाल यांच्यावर ताशेरे ओढले होते. आर एस शर्मा, प्रदीप सावंत यासह काही अधिकाऱ्यांना जयस्वाल यांनी अटक केली होती. सुबोध कुमार जयस्वाल मुंबईत दाखल झाले असून त्यांनी पोलीस महासंचालकांची भेट घेतली असून पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार त्यांनी हाती घेतला असल्याची माहिती आहे.

COMMENTS