लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत सुमित्रा महाजन यांचा मोठा निर्णय!

लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत सुमित्रा महाजन यांचा मोठा निर्णय!

नवी दिल्ली – भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि मावळत्या लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. सुमित्रा महाजन यांनी स्वतः पत्र लिहून आपण निवडणूक लढणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. पक्षात काही अनिश्चितता किंवा असामंजस्य असेल तर ते दूर व्हायला हवं, म्हणून मी ही घोषणा करीत आहे’, असं महाजन यांनी पत्रात म्हटलं आहे.तसेच ‘इंदूरच्या लोकांनी मला खूप प्रेम दिलं. भाजपच्या सहकाऱ्यांनी नेहमीच मदत केली, सहकार्य केलं. त्यांची मी आभारी आहे, असं सांगून त्यांनी लवकरात लवकर इंदूरमधून उमेदवार जाहीर करावा. म्हणजे  कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना काम करण्याची दिशा मिळेल असही म्हटलं आहे.

दरम्यान महाजन यांच्या इंदूर मतदारसंघातून भाजपनं अजून उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यामुळे याठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम होता. या निवडणुकीसाठी महाजन यांना उमेदवारी देणार नाही आणि त्यांचीही राजकीय कारकीर्द संपुष्टात येणार, अशी चर्चा गेले अनेक दिवस सुरू होती. या निवडणुकीत वयोवृद्ध नेत्यांना उमेदवारी न देण्याचं भाजपचं धोरण आहे. त्यामुळे भाजपने निर्णय जाहीर करण्यापूर्वीच महाजन यांनी आपण निवडणूक लढवणार नसल्याचं म्हटलं आहे.

COMMENTS