राष्ट्रवादीच्या पदयात्रेत सुप्रिया सुळेंनी  मेळघाटातील आदिवासींसोबत केलेला डान्स पहा !

राष्ट्रवादीच्या पदयात्रेत सुप्रिया सुळेंनी  मेळघाटातील आदिवासींसोबत केलेला डान्स पहा !

अमरावती – राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकार विरोधातील हल्लाबोल यात्रेचा आज चौथा दिवस आहे.  आजच्या चौथ्या दिवसाची सुरूवात आदिवासींच्या पारंपरिक नृत्याने  झाली. मेळघाटातल्या कोरकू आदिवासींच्या गादुली सुसुन या पारंपरिक नृत्याद्वारे यात्रेत चांगलीच रंगत आणली. खासदार सुप्रिया सुळे यांनी आदिवांसीसोबत ठेका धरला. आज हल्लाबोल यात्रा भिडी – कस्तुरबा ग्रामीण स्वास्थ्य केंद्र – रत्नापुर – दापोर एकपाला फाटा -देवळी – हिंगणघाट फाटा या मार्गावरुन जाणार आहे.

या यात्रेत आजही स्थानिक शेतकरी आणि नागरिक मोठ्या प्रमाणात सामिल झाले होते. या यात्रेदरम्यान मडकोना गावचा निलेश कोंढरे मुंडावळ्या आणि फेटा ल्यायलेल्या या नवरदेवानेच उत्साहाने नेत्यांसोबत सेल्फी काढला. अजित दादांनी लगबगीने त्याच्या लग्नाप्रित्यर्थ अहेरही सुपूर्द केला.

 

COMMENTS