धनगर आरक्षणाबाबत सरकारकडून फसवणूक, सुप्रिया सुळेंनी पुराव्यांसहीत केली पोलखोल ! VIDEO

धनगर आरक्षणाबाबत सरकारकडून फसवणूक, सुप्रिया सुळेंनी पुराव्यांसहीत केली पोलखोल ! VIDEO

नवी दिल्ली – धनगर आरक्षणाबाबत राज्य सरकारनं केंद्राकडे प्रस्तावच पाठवला नसल्याचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. संससदेच्या अधिवेशनादरम्यान ही माहिती उघड झाली असून प्रश्नोत्तराच्या तासात धनगर आरक्षणाबाबत सवाल करण्यात आला होता. या प्रश्नाला केंद्रानं उत्तर दिलं असून यामध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत राज्य सरकारनं केंद्राकडे प्रस्ताव पाठवणं गरजेचं आहे. परंतु राज्य सरकारनं अजूनपर्यंत हा प्रस्ताव पाठवलेला नसल्याचं समोर आलं आहे.

दरम्यान राज्य सरकारच्या या कारभारमुळे मुख्यमंत्र्यांचा खोटारडेपणा समोर आला आहे. सरकारला चार वर्ष पूर्ण झाली आहेत. निवडून आल्यानंतर पहिल्याच वर्षी धनगर समाजाला एसटीत आरक्षण दिलं जाईल असं आश्वासन दिलं होतं. परंतु चार वर्ष पूर्ण झाली तरी अजून राज्य सरकारनं धनगर आरक्षणाबाबत केंद्राकडे साधा प्रस्ताव पाठवला नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाची फसवणूक करणं आता तरी बंद करावे अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

COMMENTS