महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना ‘भारतरत्न’ द्या, खासदार सुप्रिया सुळेंची मागणी !

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना ‘भारतरत्न’ द्या, खासदार सुप्रिया सुळेंची मागणी !

मुंबई  ज्यांनी स्त्री शिक्षणासाठी आपले आयुष्य खर्ची केले त्या महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. सुप्रिया सुळे यांनी याबाबत ट्वीट केलं असून या दोघांनाही मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्यावा असं त्या म्हणाल्या आहेत.

 

दरम्यान महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या दोघांनीही मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी मोठे काम केले आहे. त्यांच्यामुळे आज स्त्रिया स्वाभिमानाने जगत आहेत. त्यामुळे त्यांना भारतीय कलम 377 नुसार मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार द्यावा अशी विनंती सुप्रिया सुळे यांनी केली आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. यादरम्यान पहिल्याच दिवशी सुप्रिया सुळे यांनी सरकारकडे ही मागणी केली आहे.

COMMENTS