म्हणून शरद पवार फिल्डवर असतात – सुप्रिया सुळे

म्हणून शरद पवार फिल्डवर असतात – सुप्रिया सुळे

पुणे – राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. शरद पवार हे फिल्डवरचे नेते आहेत म्हणून ते फिल्डवर असतात. पण काम कसं करायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न असं सांगत फोनवरून दुष्काळाची माहित घेणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुप्रिया सुळे यांनी टोला लगावला आहे. तसेच ईव्हीएम नकोच अशीच आमची भूमिका आहे,  मुख्यमंत्री फडणवीस यांचा आवडता शब्द पारदर्शक आहे. त्यामुळे पारदर्शकता पाहिजे असेल तर ईव्हीएम नकोच असं सुळे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुण्यातील डेक्कन जिमखाना येथील गरवारे पुलाजवळ असलेल्या छञपती संभाजी राजे यांच्या पुतळ्याला हार घालून सुप्रिया सुळे यांनी अभिवादन केलं. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी सुप्रिया सुळे यांच्याबरोबरच भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे देखील उपस्थित होते. यावेळी राज्यात भाजप एक नंबरला राहील असं संजय काकडे यांनी म्हटलं आहे. तसेच मावळ,बारामती यांच्या अंदाजविषयी मात्र बोलण काकडे यांनी टाळलं आहे.

COMMENTS