उदयनराजेंना उमेदवारी देण्याबाबत सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया !

उदयनराजेंना उमेदवारी देण्याबाबत सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया !

मुंबई – सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे यांना उमेदवारी देण्याबाबत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी वक्तव्य केलं आहे. उदयनराजेंना उमेदवारी देण्याचा अधिकार मला नाही, पण तो निर्णय अद्याप झालेला नसल्याचं सुळे यांनी म्हटलं आहे. तसेच कुठल्याही नावाला विरोध नाही सगळ्या नावावर सविस्तर चर्चा झाली असून प्रत्येक मतदारसंघात एकापेक्षा जास्त इच्छूक आहेत ही एक चांगली बाब असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच लोकांना विश्वास आहे आपण उभे राहिलो तर निवडून येऊ शकतो. तसेच पक्षात एक सिस्टीम असते त्यानुसार लवकरात लवकर सगळेच निर्णय होतील असही त्या म्हणाल्या आहेत.

दरम्यान रायगडमध्ये भास्कर जाधव यांनी अनपेक्षितपणे उमेदवारी मागितली असं म्हणता येणार नाही. सगळ्याच मतदारसंघाची चांगली आणि मनमोकळेपणाने चर्चा झाली. शरद पवारांचा प्रयत्न होता की कार्यकर्त्यांचे मत आपण जाणून घेतलं पाहिजे, अन्यथा आम्ही तिकीट लादू शकलो असतो. आता कार्यकर्त्यांचे मत आम्ही जाणून घेतलं आहे, त्यावर सविस्तर चर्चा होईल नंतर उमेदवार निवडले जातील असही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS