सुशीलकुमार शिंदेंचं शरद पवारांना भावनिक आवाहन!

सुशीलकुमार शिंदेंचं शरद पवारांना भावनिक आवाहन!

सोलापूर –  सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार आणि ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिदे यांनी राष्टेरवादीचे अध्यक्ष शरद पवारांना भावनिक आवाहन केलं आहे. मला शेवटच्या निवडणुकीत पवारांची साथ पाहिजे, असं त्यांनी म्हटलं आहे. मी अनेकवेळा निवडणुका लढविल्या. शरद पवारांनीच मला राजकारणात आणलं आहे त्यामुळे मला या निवडणुकीतही त्यांची साथ हवी असल्याचं सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे. ते काँग्रेस- राष्ट्रवादीच्या निर्धार मेळाव्यात बोलत होते.

दरम्यान 2014 साली सोलापूर लोकसभा मतदारसंघातून पराभूत झाल्यानंतर, पुन्हा एकदा काँग्रेसने सुशीलकुमार शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. 2014 साली मोदीलाटेमुळे शिंदेंना पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र, सोलापूरची जागा काँग्रेसची हक्काची जागा मानली जाते. परंतु यावेळी सुशीलकुमार शिंदे यांच्यासमोर वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर हे मैदानात उतरले आहेत. त्यामुळे सोलापूरची लढत रंगतदार होणार असल्याचं दिसत आहे.

COMMENTS