स्वाभिमानीच्या आंदोलनाचे राज्यभरात पडसाद, तिढा सोडवण्यासाठी सरकारचा नवा फॉर्म्युला ?

स्वाभिमानीच्या आंदोलनाचे राज्यभरात पडसाद, तिढा सोडवण्यासाठी सरकारचा नवा फॉर्म्युला ?

कोल्हापूर – स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध आंदोलनाला आजपासून सुरुवात झाली आहे. राज्यभरात या आंदोलनाचे पडसाद पहायला मिळत आहेत. कोल्हापुरातील ग्रामदेवतेच्या समाधीला दुग्धाभिषेक घालून या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. तसेच सोलापुरातील माढा आणि सांगोला तालुक्यात दूध रस्त्यावर ओतून सरकारचा निषेध करण्यात आला आहे. राज्यभरात अनेक ठिकाणच्या दुधाच्या गाड्या फोडल्या असल्याची माहिती आहे.

दरम्यान दुधाला 5 रुपये प्रतिलिटर दरवाढ देण्याच्या मागणीवरुन स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. त्यामुळे स्वाभिमानीनं आपल्या आंदोलनाला सुरुवात केली असून आज मुंबईमध्ये दूध येणार नसल्याचं दिसत आहे. मुंबईकडे येणा-या अनेक गाड्या स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी रोखल्या असून औरंगाबादमधील वैजापूरमध्ये दुधाच्या बॅगा रस्त्यावर फेकण्यात आल्या आहेत.

दरम्यान या आंदोलनाला सुरुवात झाल्यानंतर दूध दराचा तिढा सोडण्यासाठी राज्य सरकारकडून 70/30 च्या फॉर्म्यूल्यावर विचार सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हा फॉर्म्यूला साखर कारखान्यावर लागू असून तोच दुधासाठीही लागू करण्याचा विचार असल्याची माहिती आहे. त्यामुळे सरकारच्या हालचालींकडे लक्ष लगालं आहे.

COMMENTS