महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा उद्या मेळावा, नारायण राणे काय भूमिका घेणार ?

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा उद्या मेळावा, नारायण राणे काय भूमिका घेणार ?

मुंबई खासदार नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा उद्या मुंबईत मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्यात नाराण राणे हे काय भूमिका मांडणार याकडे लक्ष लागलं आहे. कारण भाजपाध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये आज ‘मातोश्री’वर भेट होणार आहे. त्यांच्या या भेटीबाबत नारायण राणे हे काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलं आहे.  उद्या संध्याकाळी सहा वाजता वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा मेळावा पार पडणार आहे.

दरम्यान महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या स्थापनेनंतर मुंबईत पहिल्यांदाच कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची ताकद या मेळाव्यातून दाखवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षकपदाची निवडणूक महाराष्ट्र स्वाभिमान पक्षानं लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुकांसोबत  2019 लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या संदर्भात राणे या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.  त्यामुळे या मेळाव्याकडे लक्ष लागलं असून नारायण राणे हे उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्या भेटीबाबतही काय बोलणार याकडे लक्ष लागलं आहे.

 

COMMENTS