मराठा आरक्षणाबाबत 7 ऑगस्टपर्यंत निर्णय घ्या, मराठा क्रांती मोर्चाचा इशारा !

मराठा आरक्षणाबाबत 7 ऑगस्टपर्यंत निर्णय घ्या, मराठा क्रांती मोर्चाचा इशारा !

बीड – मराठा क्रांती मोर्चाची बैठक आज परळी येथे पार पडली आहे. या बैठकीदरम्यान राज्य सरकारनं मराठा आरक्षणाबाबत 7 ऑगस्टपर्यंत निर्णय घ्यावा अन्यथा 9 ऑगस्टला राज्यभरात रस्त्यावर उतरण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आबा पाटील यांनी दिला आहे. तसेच आंदोलनादरम्यान ज्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यांना योग्य मदत देण्याची मागणीही आबा पाटील यांनी केली आहे.

दरम्यान परळीमध्ये गेल्या 16 दिवसांपासून मराठा समाजाचं आंदोलन सुरु आहे. सरकारकडून जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत माघार घेणार नसल्याचा पवित्रा या आंदोलकांनी घेतला आहे. तसेच सरकार जर इतर ठिकाणच्या मराठा कार्यकर्त्यांशी चर्चा करत असेल तर ते आम्हाला मान्य नसून जी काही चर्चा करायची आहे. ती इथे येऊनच करा असंही मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी म्हटलं आहे. तसेच सर्व शासकीय निमशासकीय मेगा भरती तात्काळ आरक्षण जाहीर झाल्यावर करावी. चंद्रकांत पाटील यांची समिती रद्द करण्याची मागणीही आबा पाटील यांनी यावेळी केली आहे. सरकारचे विभागीय आयुक्त आणि इतर अधिकारी यांचेशी बोलणी चालू असून तीन मागण्यांवर चर्चा सुरू आहे तसेच कालबद्ध पद्धतीने आरक्षण जाहीर केल्यास याबाबत विचार करू असंही आबा पाटील यांनी म्हटलं आहे.

COMMENTS