चंद्राबाबू नायडूंना मोठा झटका, टीडीपीचे चार खासदार भाजपच्या वाटेवर!

चंद्राबाबू नायडूंना मोठा झटका, टीडीपीचे चार खासदार भाजपच्या वाटेवर!

नवी दिल्ली – आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि तेलगु देशम पार्टीचे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडूंना मोठा झटका बसला आहे. कारण टीडीपीचे चार खासदार भाजपच्या वाटेवर असून ते लवकरच भाजपमध्ये जाणार आहेत.
खासदार वाय एस चौधरी, सी एम रमेश, राम मोहन राव, टी जी व्यंकटेश भाजपमध्ये जाणार असल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वीच टीडीपीचे जे पी नड्डा हे कार्याध्यक्ष झाल्यानंतर टीडीपीला मोठा झटका बसला आहे.

दरम्यान टीडीपीचे खासदार वाय एस चौधरी यांनी आपण भाजपमध्ये जाणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे टीडीपीचे एकूण सहा खासदार आहेत. या सहापैकी चार खासदारांनी पक्ष सोडला तर त्यांच्यावर पक्षबदलाचा कायदा होऊ शकणार नाही. त्यामुळे त्यांनी पक्ष बदलला तरी ते राज्यसभेचे सदस्य राहु शकणार आहेत.

COMMENTS