ठाण्यातील राष्ट्रवादीच्या नगरसेविकेला लाच घेताना अटक !

ठाण्यातील राष्ट्रवादीच्या नगरसेविकेला लाच घेताना अटक !

ठाणे – ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविकेला लाच घेताना एसीबीनं अटक केली आहे. मुंब्रा भागातील राष्ट्रवादीची प्रभाग क्रमांक 31 अ येथील सुनीता सातपुते या नगरसेविकेला 20000 ची लाच घेताना ठाणे एसबीच्या विभागाने अटक केली आहे. बांधकामाचे काम सुरू ठेवण्यासाठी त्यांनी गुतेदाराकडे 20 हजारांची लाच मागितली होती.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका असलेल्या सुनिता सातपुते यांनी मुंब्र्यात बांधकाम चालु ठेवण्यासाठी लाच मागितली होती. याबाबतची माहिती गुतेदारानं एसीबीला दिली होती. त्यानंतर सापळा रचून सुनिता सातपुते यांना अटक केली आहे. त्यामुळे सुनिता सातपुते यांच्यावर पक्षाकडून काय कारवाई केली जाते याकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS