मराठा आरक्षणाचा आणखी एक बळी, कळंबच्या तृष्णाने विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली

मराठा आरक्षणाचा आणखी एक बळी, कळंबच्या तृष्णाने विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली

कळंब- मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळे भावाला आणि स्वतहाला नौकरी मिळणार नाही. त्यामुळे शिकून काय उपयोग असे म्हणत कळंब तालुक्यातील देवळाली येथील एक युवतीने विष प्राशन करुन आत्महत्या केली आहे.

कळंब तालुक्यातील देवळाली येथील तानाजी व्यंकटराव माने यांना दोन मुली व एक मुलगा आहे. मोठा मुलगा तुषार चे बी. ए. पुर्ण केले असुन तो सुशिक्षित बेकार आहे. तृष्णा ही उस्मानाबाद येथील व्ही. के. शिंदे येथील महाविद्यालयात बी. कॉम व्दितीय वर्षात शिक्षण घेत आहे. व दुसरी मुलगी उस्मानाबाद येथील श्रीपतराव भोसले हायस्कूल येथे ९ वी मध्ये शिक्षण घेत आहे. हे तिघे उस्मानाबाद येथील बार्शी नाका येथे रुम करुन राहतात. दिनांक २९ जुलै रोजी उस्मानाबाद येथून देवळाली येथे आले होते. त्याच दिवशी रात्री सर्व मंडळी घरी बसलेले असताना तृष्णा म्हणाली मराठा समाजासाठी आरक्षण नाही, शैक्षणिक सवलत नाहीत, नौकरी मिळत नाही,
मोठ्या भावाचे बी. ए. पर्यंत शिक्षण झाले तो सुद्धा घरीच आहे. त्याला नौकरी मिळत नाही. ही चिंता तृष्णा च्या मनात घर करुन होती.

२९ जुलै रोजी ( रविवार ) रोजी तृष्णा घरी मराठा समाजाला आरक्षण नाही त्यामुळे नौकरी मिळत नाही, आम्ही शिक्षण घेण्यात काहीच काय उपयोग नाही, आपल्या जगण्यात काहीच अर्थ नाही असे म्हणत दुपारी १२ ते १ वाजण्याच्या दरम्यान तृष्णा ने तनाशक विषारी
पिले तिला तात्काळ औषध उपचार करण्यासाठी उस्मानाबाद येथील आय. सी. यु हॉस्पिटल दाखल करण्यात आले होते. दिनांक १ ऑगस्ट रोजी सांयकाळी ६ वाजता उपचारा दरम्यान तृष्णा ची मृत्यू झाला आहे. दिनांक २ ऑगस्ट रोजी तृष्णा चा अंत्यविधी देवळाली येथे करण्यात आला आहे.

COMMENTS