भाजपची ताकद वाढली, ‘या’ दोन अपक्ष आमदारांनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट !

भाजपची ताकद वाढली, ‘या’ दोन अपक्ष आमदारांनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट !

मुंबई – सत्तास्थापन करण्यासाठी शिवसेना-भाजपमध्ये रस्सीखेच सुरु आहे. त्यामुळे आपली ताकद वाढवण्यासाठी दोन्ही पक्षांकडून प्रयत्न सुरु आहेत. अपक्ष आमदार आपल्या पक्षात घेऊन ताकद वाढवण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षातील नेते करत आहेत. अशातच आज गोंदियाचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. अग्रवाल यांनी भाजपाला पाठिंबा देत असल्याचं पत्र मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केलं आहे. तसेच आमदार महेश बालदी यांनीदेखील भाजपला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे आता भाजपचं संख्याबळ 105 वरुन 107 झालं आहे. त्यामुळे भाजपची ताकद वाढली असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच प्रहार जनशक्ती पक्षाच्या दोन आमदारांनी तसेच दोन अपक्ष आमदारांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेचं संख्याबळ 60 झालं आहे. तर भाजपला सुरुवातीला आमदार रवी राणा यांनी आणि आता 2 अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळाल्याने भाजपचं संख्याबळ 105+3 = 108 झालं आहे.

COMMENTS